शेतकरी तरुणांची लग्नही रखडली

शेतीमालाला भाव नाही, दुष्काळ हे शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित विषय ऐरणीवर असतानाच शेती करणाऱ्या तरुणांची लग्नेही रखडल्याची बाब पुढे आली आहे.

Updated: Jul 13, 2017, 07:01 PM IST
शेतकरी तरुणांची लग्नही रखडली  title=

अहमदनगर : शेतीमालाला भाव नाही, दुष्काळ हे शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित विषय ऐरणीवर असतानाच शेती करणाऱ्या तरुणांची लग्नेही रखडल्याची बाब पुढे आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ४५ गावांमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात विवाह रखडलेले 3 हजार 68 तरुण आढळून आलेत.

शेती करणाऱ्या तरुणाशी विवाह करण्यापेक्षा शहरात नोकरी करणाऱ्या तरुणांशी विवाह करण्याकडे शेतकरी कुटुंबांमधील मुलींचा कल असल्याच दिसून येतय. राज्यातील शेतक-यांना शेतीतून पुरेस उत्पन्न मिळत नाही तर दुसरीकडे शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी कुटबीयंची आर्थीक स्थिती तशी कमकुवतच होत चालली आहे.

दुसरीकडे शेतकरी कुटुंबातील शेतकरी मुले आणि मुलीही उच्चशिक्षीत होत असल्याने अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळत नसल्यानेही लग्न रखडल्याचं समोर आलंय. जिल्ह्यातील सामजीक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी आणि विठ्ठल शेवाळे यांनी जिल्ह्यातील ४५ गावात सर्वे केला. त्यात तीन हजाराच्यावर मुलांची लग्न रखडल्याच समोर आलंय.