वीज ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी मिस्ड कॉल सुविधा

वीज पुरवठा खंडित झाल्यावर ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. फोनवर तक्रार नोंदविण्यासाठी बराच वेळ ताटकळत राहावं लागतं. ग्राहकांची हीच समस्य़ा लक्षात घेऊन एसएनडीएलतर्फे नागपुरात वीज ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी मिस्ड कॉल सुविधा सुरू करण्यात आलीय.

Updated: Sep 4, 2017, 08:00 PM IST
वीज ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी मिस्ड कॉल सुविधा title=

नागपूर : वीज पुरवठा खंडित झाल्यावर ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. फोनवर तक्रार नोंदविण्यासाठी बराच वेळ ताटकळत राहावं लागतं. ग्राहकांची हीच समस्य़ा लक्षात घेऊन एसएनडीएलतर्फे नागपुरात वीज ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी मिस्ड कॉल सुविधा सुरू करण्यात आलीय.

एस्सेल समूहाची एसएनडीएल कंपनीतर्फे नागपूरात वीज वितरण करण्यात येतं. तक्रार नोंदविण्यासाठी कंपनीकडून 1800-102-1825 हा फोन क्रमांक जारी करण्यात आलाय. या क्रमांकावर नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून मिस्ड कॉल दिल्यास ग्राहकांच्या तक्रारीची त्वरित नोंद घेतली जाईल आणि संबंधित समस्येवर तोडगा काढण्यात येईल. 

राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूरच्या महापौर नंदाताई जिचकार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या सुविधेची सुरूवात करण्यात आली. एसएनडीएलचे आधुनिकरणाकडे एक पाऊल अशा शब्दात उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली.