close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अजगराच्या विळख्यात सापडली शेळी

अजगाराच्या विळख्यात सापडलेल्या एक बकरीचा व्हिडिओ सध्या रत्नागिरीत  व्हायरल झालाय. घटना बुधवारी दुपारची आहे. 

Updated: Sep 14, 2017, 01:05 PM IST
अजगराच्या विळख्यात सापडली शेळी

रत्नागिरी : अजगाराच्या विळख्यात सापडलेल्या एक बकरीचा व्हिडिओ सध्या रत्नागिरीत  व्हायरल झालाय. घटना बुधवारी दुपारची आहे. 

संगमेश्वर तालुक्यात हातीव गावातली आहे. चरायला गेलेल्या शेळ्याच्या कळपात आठ फुटी अजगर घुसला. त्यानं एका शेळीला गिळायला सुरूवात केली.  

शेळी राखणाऱ्या वृद्ध महिलेनं घाबरलेल्या अवस्थेत गावात धाव घेतली. पण तरुण पोहेचपर्यंत अर्धी शेळी अजगराच्या घशात गेली होती. सर्पमित्रांनी अजगराला पकडून शेळीची सुटका केली. पण तोपर्यंत तिचा जीव गेला होता. त्यानंतर हा अजगर वनविभागाच्या कर्मचा-यांकडे सूपूर्द करण्यात आला.