Milk Price Hike : ऐन सणासुदीला ग्राहकांच्या खिशाला कात्री! गोकुळची दूध दरवाढ, 'असे' असतील नवे दर

Milk Price Hike : ऐन सणासुदीला ग्राहकांना दूध दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. कारण गोकुळ दूध महागल असून आतापासूनचं नवे दर लागू होणार नाही. गोकुळचं म्हशीचं दूध सरासरी 2 रूपये तर गाईचं दूध सरासरी 3 रूपये महाग झालंय. गोकुळने गाय आणि म्हैस दूध खरेदी दर वाढवल्याने त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे.   

Updated: Oct 18, 2022, 09:50 AM IST
Milk Price Hike :  ऐन सणासुदीला ग्राहकांच्या खिशाला कात्री! गोकुळची दूध दरवाढ, 'असे' असतील नवे दर  title=

Gokul Milk Rate  : येत्या काही दिवसांत दिवाळी (Diwali 2022 ) सणाला सुरूवात होत  आहे. त्यातच म्हशीच्या आणि गाईच्या दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. तसंच म्हशीच्या दूध विक्री दरातही वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारपासून नव्या दूध दरवाढीची अंमलबजावणी केली जाईल. 

असे आहेत नवे दर

नव्या दरांप्रमाणे आता म्हशीच्या दूध खरेदी करताना प्रति लिटर 2 रुपये मोजावे लागणार आहेत. तर गाईच्या दूध खरेदी करताना प्रति लिटर 3 रुपये मोजावे लागणार आहे.  दरवाढीनंतर आता म्हशीला प्रति लिटर 47.50 पैसे तर गाईला प्रति लिटर 35 रुपये दर मिळणार आहे. गेल्या दीड वर्षात 9 रुपयांची दूध दरवाढ नोंदवण्यात आली आहे. आतापर्यंत सहा वेळा दूध खरेदी-विक्री दरात वाढ करण्यात आली आहे.

वाचा : दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होणार? जाणून घ्या लेटेस्ट दर

शहरांत अशी असेल गोकुळ दुधाची किंमत 

दुसरीकडे म्हशीच्या दूध विक्री दरातही 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आधी म्हशीच्या एक लिटर दुधाचा दर कोल्हापूरमध्ये 60 रुपये होता. तो आता 63 रुपये इतका झाला आहे. तर अर्धा लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 30 रुपयांवरुन 32 रुपये इतकी झाली आहे. 

तर मुंबई, पुण्यात एक लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 66 रुपयांवरुन आता 69 रुपये झाली आहे. तर अर्धा लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 33 रुपयांवर 35 रुपये इतकी झाली आहे. 

6.0 फॅट आणि 9.0 एसएनएफ प्रतिलिटर 45.50 पैसे इतका खरेदी दर म्हशीच्या दुधाला आधी मिळत होता. तो आता 47.50 झाला असून गायीच्या दूधाचा खरेदी दर 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ प्रतिलीटर 32 वरुन 35 रुपये इतका झाला आहे. 21 ऑक्टोबरपासून हे नवे दर लागू केले जाणार आहेत.