भरदिवसा 9 लाख 85 हजारांचे दागिने लंपास

चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Updated: Sep 11, 2018, 05:16 PM IST
भरदिवसा 9 लाख 85 हजारांचे दागिने लंपास

पुणे : एका चोरट्याने भर दिवसा 9 लाख 85 हजार 800 रुपये किमतीचे 382 ग्रॅम सोन्याचे तर 500 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरले. मात्र चोरी केल्यानंतर अगदी सज्जनपणाचा आव आणून जाणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. ही घटना गगनगिरी सदन, राम मंदिराजवळ पुनवळे मध्ये घडलीय. वाकड पोलिसांनी या संशयितांचे नाव माहिती असल्यास काळवण्याचे आवाहन केलं आहे.