नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने महिलेचा मृत्यू

महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू 

Updated: Sep 11, 2018, 04:23 PM IST
नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने महिलेचा मृत्यू

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील एका महिलेचा स्वाईन फ्लूच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्लू या जीवघेण्या आजाराने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात येवला इथल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय. 

खासगी रुग्णालयातील उपचारानंतर सोमवारी ही महिला जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. अवघ्या तासाभराच्या उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. दरम्यान आठवडाभरापासून स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून कक्षात 12 रुग्णांवर उपचार सुरू आहे.