मुंबईकरांसाठी मोठी बातमी; मेट्रो-३ मार्गावर आणखी एक स्थानक उभारणार; आता आरेतून थेट...

Mumbai Metro 3 Line Updates: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या मुंबई मेट्रो 3 (Mumbai Metro 3) प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 14, 2023, 01:18 PM IST
मुंबईकरांसाठी मोठी बातमी; मेट्रो-३ मार्गावर आणखी एक स्थानक उभारणार; आता आरेतून थेट... title=
good news Mumbai Metro 3 extended till Navy Nagar

Mumbai Metro 3 Update: मुंबई मेट्रो 3 कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येण्यास सज्ज आहे. या मार्गिकेच्या पहिला टप्पा सुरू करण्यासाठी अत्यावश्यक असलेली आणि अखेरची गाडी अलीकडेच कारशेड परिसरात दाखल झाली आहे. मात्र, आता या प्रकल्पाबाबत आणखी एक अपडेट समोर येत आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गिकेचा कफ परेड ते नेव्ही नगर असा विस्तार करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल काँर्पोरेशनने आधी घेतला होता. २०२५ मध्ये याविस्तारीत मार्गिकेच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो 3 मार्गिकेच्या 33 किमीच्या संपूर्ण भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामाला 2016 मध्ये सुरुवात झाली होती. या मार्गावर एकूण 27 मेट्रो स्थानके आहेत. अहवालानुसार मेट्रो ३ चा कफ परेडपासून नेव्हीनगरपर्यंत २.५ किमीने विस्तार होणार असून या दरम्यान एकमेव नेव्ही नगर मेट्रो स्थानक असणार आहे. लवकरच या आराखड्याला परवानगी घेत आराखडा मंजुर करण्यात येणार आहे. तर २०२५ मध्ये याविस्तारीत मार्गिकेच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे.

मुंबई मेट्रो 3 हा मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यातील भुयारीकरण 100 टक्के पूर्ण झाले असून स्थानकांची उभारणी 98 टक्के पूर्ण झाली असून चार स्थानके जवळपास सज्ज झाले आहेत. मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचे काम वेगात सुरू असतानाच एकीकडे एमएमआरसीकडून एमएमआरसीने मेट्रो ३ च्या विस्तारलाही प्राधान्य देण्यात येत आहे. 

कफ परेड ते नेव्ही नगर अशा विस्तारीत मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल नुकताच पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. या अहवालानुसार २.५ किमीने कफ परेड ते नेव्ही नगर असा मेट्रो ३ चा विस्तार होणार आहे. तर यात नेव्हीनगर या एकमेव मेट्रो स्थानकाचा समावेश असणार आहे. टाटा इन्स्टिट्युट आँफ फंडामेन्टल रिसर्च (टीआयएफआर) जवळ हे स्थानक असणार आहे. या विस्तारीत मार्गिकेसाठी अंदाजे २५०० कोटींचा निधी लागण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून काम पूर्ण होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०३०-३१ मध्ये मुंबईकरांना आरे ते नेव्ही नगर असा थेट प्रवास करता येणार आहे