GramPanchayat Election Result : भाजपच्या दिग्गजांना पराभवाचा धक्का

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या दिग्गजांना धक्का

Updated: Jan 18, 2021, 12:14 PM IST
GramPanchayat Election Result : भाजपच्या दिग्गजांना पराभवाचा धक्का title=

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या दिग्गजांना धक्का बसलेला पहायला मिळतोय. चंद्रकांत पाटलांच्या मूळगावी खानापुरात सेनेची सत्ता आलीय. लोणी खुर्दमध्ये सत्ता परिवर्तन होऊन विखें पाटलांनी सत्ता गमावली आहे. तर प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाणाऱ्या सिंधुदुर्गात राणेंना जोरदार धक्का देत भिरवंडेत शिवसेनेची सत्ता आलीय.

कोल्हापूर जिल्ह्यात चंद्रकांत पाटील यांना खानापूर ग्रामपंचायतीत मोठा धक्का बसलाय. शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर गटाने ९ पैकी ६ जागा जिंकल्या आहेत. खानापूरमध्ये शिवसेना विरोधात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी होती. तर कागलच्या सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने झेंडा रोवलाय. भाजपची सत्ता उलटवून १५ पैकी ११ जागा जिंकल्या आहेत.

लोणी खुर्द गावात सत्ता परीवर्तन विखे विरोधी गटाने 17 पैकी 11 जागा मिळवत विखे गटाची सत्ता आणली. संपुष्टात लोणी खुर्द ग्रामपंचायत निवडणुक परिवर्तन पँनला मिळाल यश मिळालय.
 
सिंधुदुर्गातील भिरवंडे ग्रामपंचायतीत राणे कुटुंबाला धक्का देत शिवसेनेने विजय मिळवलाय. कणकवलीत पहिलीच ग्रामपंचायत शिवसेनेकडे गेली आहे.
नितेश राणेंना जिल्ह्यात पहिला धक्का बसलाय. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीला सुरवात झाली आहे. कणकवलीत भिरवंडे ग्रामपंचायत शिवसेनेकडे आल्याने शिवसैनिकानी जल्लोष केला. जिल्ह्यात आज 66 ग्रामपंचायतींची मतमोजणीला सुरवात झाली आहे. जिल्ह्यात एकूण 70 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 4 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत.  भाजपला आणि नितेश राणेंना जिल्ह्यात पहिला धक्का बसला आहे.
 
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पाली ग्रामपंचायत राखलीय. पाली ग्रामपंचायतीत उदय सामंत यांनी बाजी मारलीय. 11 च्या 11 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत. यापुर्वी पाली ग्रामपंचायतीमधील दहा जागांवर बिनविरोध निवड झाली होती. फक्त एका जागेवर निवडणुक होत होती. एका जागेवर सुद्धा सेनेच्या उमेदवारांनी बाजी मारलीय. रत्नागिरी तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेनी बाजी मारलीय. कर्ला, कळझोंडी, खेडशी, गडनरळ, पाली ग्रामपंचायती सेनेकडे गेल्यात. तर ओरी आणि काळबादेवी, कासारी ग्रामपंचायत गाव पॅनलकडे गेलीय.

सावंतवाडी तालुक्यातील आरोस ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे झेंडा फडकला असून 7 पैकी 5 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेयत.