२०१९ च्या आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत

राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी आज नागपूर विधान भवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढला. 

Updated: Dec 12, 2017, 05:51 PM IST
२०१९ च्या आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत  title=

नागपूर : राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी आज नागपूर विधान भवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढला. 

भाजप सरकारवर आगपाखड

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा मोर्चा धनवटे कॉलेजपासून निघाला. तर दीक्षा भूमीपासून निघालेल्या काँग्रेसच्या मोर्चाचं नेतृत्व गुलाम नबी आझाद यांनी केलं. दोन्ही मोर्चे विधीमंडळाजवळ एकत्र आल्यानंतर या विराट मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत झालं. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या कारभारावर यावेळी सर्वच नेत्यांनी जोरदार आगपाखड केली. 

एकत्र येण्याचे संकेत

२०१९ च्या आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत गुलाम नबी आझाद यांनी दिले. तर शेतक-यांनी वीज बिल भरू नका, असं आवाहन पवारांनी यावेळी केलं.