सारंगखेड्याचा अश्व बाजार कोटीच्या कोटी उड्डाण

सारंगखेड्याचा अश्व बाजार कोटीच्या कोटी उड्डाणं घेतंय. पहिल्याच आठवड्यात अश्वांच्या खरेदी विक्रीतून एक कोटींपेक्षा जास्तीची उलाढाल झाली. 

Updated: Dec 12, 2017, 05:21 PM IST
सारंगखेड्याचा अश्व बाजार कोटीच्या कोटी उड्डाण title=

नंदुरबार : सारंगखेड्याचा अश्व बाजार कोटीच्या कोटी उड्डाणं घेतंय. पहिल्याच आठवड्यात अश्वांच्या खरेदी विक्रीतून एक कोटींपेक्षा जास्तीची उलाढाल झाली. 

अश्व बाजारात तीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल 

यावर्षी या अश्व बाजारात तीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवलीय. विशेष म्हणजे या वर्षी भव्य दिव्या आयोजन सारंगखेड्यात मोठ्या आर्थिक उलाढालीला कारणीभूत ठरतंय. आबालवृद्धांना आकर्षित करण्यासाठी या यात्रेत विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि मनोरंजकांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 

शेती अवजारांसाठी प्रसिद्ध

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याची यात्रा जशी अश्वांसाठी प्रसिद्ध आहे तशीच ही यात्रा शेती अवजारांसाठी देखील प्रसिद्ध आहे. त्यामुळेच शेतकरी सारंगखेड्याच्या या यात्रेस लाकडी आणि लोखंडी बैलगाड्या खरेदी करण्यासाठी आवर्जून भेट देतात. 

राज्यभरातून येतात लोक

सारंगखेड्याचा गाडीबाजारात राज्यभरातून लाकडी बैलगाडी आणि अवजारं विक्री साठी दाखल होतात. मात्र लाकडाची टंचाई यामुळे भविष्यकाळात लाकडी गाडे दुर्मिळ होतील अशी भीती कारागीर व्यक्त करतायत. असं असले तरी छोट्या शेतकऱ्यांसाठी आजही बैलगाडी घर ते शेती आणि शेती ते घर या प्रवासाचं आणि साहित्य, शेतीमाल वाहतुकीचं प्रमुख साधन आहे. त्यामुळे मागणी कमी होत असली तरी काही अंशी बैलगाड्यांची मागणी टिकून आहे. 

बैलगाडीची मागणी कमी होत असल्यानं आणि साहित्य महाग होत असल्यानं हा उद्योग डबघाईस जाण्याच्या वाटेवर आहे. सारंगखेडा त्याला काही अंशी अपवाद आहे. त्यामुळे इथला बैलगाडी बाजार जिवंत आहे. 

प्रशांत परदेशी, झी मीडिया, प्रतिनिधी