Gulabrao Patil: "खड्ड्यात गेलं मंत्रिपद, उठले सुटले उंबरसुंभे..." गुलाबराव पाटलांकडून घरचा आहेर!

Maharastra Politics: ज्यांना छत्रपती माहिती आहेत त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल बोलावं. कुण्या मायचा लालला बोलण्याचा अधिकार नाही, असं रोखठोक वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. 

Updated: Dec 4, 2022, 09:22 PM IST
Gulabrao Patil: "खड्ड्यात गेलं मंत्रिपद, उठले सुटले उंबरसुंभे..." गुलाबराव पाटलांकडून घरचा आहेर! title=
Gulabrao Patil

Gulabrao Patil On Rajyapal: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची संताप वाढल्याचं दिसतंय. अशातच आता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांनी शिंदे-भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

ज्यांना छत्रपती माहिती आहेत त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल बोलावं. कुण्या मायचा लालला बोलण्याचा अधिकार नाही, असं रोखठोक वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. शिवरायांबद्दल कुणी वाकडं तिकडं बोलत असेल तर मग तो कोणत्याही पक्षाचा असेल तरी त्याला माफ केल जाणार नाही, असं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil On Rajyapal) म्हणाले आहेत.

शिवाजी महाराज हे देवाचे देव आहेत, त्यामुळे ज्यांनी त्यांच चरित्र वाचल असेल त्यांनीच बोलावं. उठले सुटले उंबरसुंभे काही पण बोलतात, महाराजांच्या नखाची पण बरोबरी या नालायकांकडून होऊ शकत नाही. शिवरायांवर बोलण्यासाठी आचारसंहिता करण्याची अत्यावश्यक गरज असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.

आणखी वाचा -Rupali Patil: "...तर त्यांची जीभ छाटली पाहिजे", रुपाली ठोंबरेंची Prasad Lad यांच्यावर सडकून टीका!

दरम्यान, मंत्रिपद गेलं खड्ड्यात...शिवरायांचा अवमान केल्यास सोडणार नाही, असा इशाराच गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून (Maharastra Politics) अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही.