वसंत मोरे यांनी पुण्यात घेतली राज ठाकरे यांची भेट

Pune Vasant More : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भोंग्या विरोधात भूमिका (Hanuman Chalisa controversy) घेणारे मनसेचे पुण्यातील माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी आज पुण्यामध्ये राज यांची भेट घेतली.  

Updated: May 8, 2022, 02:22 PM IST
वसंत मोरे यांनी पुण्यात घेतली राज ठाकरे यांची भेट title=

पुणे : Pune Vasant More : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भोंग्या विरोधात भूमिका (Hanuman Chalisa controversy) घेणारे मनसेचे पुण्यातील माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी आज पुण्यामध्ये राज यांची भेट घेतली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे आपली अडचण झाल्याचे मोरे यांनी म्हटलं होते. तेव्हापासून ते चर्चेत आहेत. त्यातूनच त्यांना शहराध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे.

दरम्यान वसंत मोरे यांनी शनिवारी त्यांच्या भागात महाअरतीचे  (Hanuman Maha-aarti)  आयोजन केले होते. त्यांनंतर राज ठाकरे यांनी स्वतः मोरे यांना फोन केला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट होती, असे निकटवर्तीयकडून सांगण्यात येत आहे. या भेटीत काय चर्चा झाली, याची माहिती देण्यात आलेली नाही.

कालची आरती चांगली झाली. या आरतीचे राज ठाकरे यांनी कौतुक केले, अशी प्रतिक्रि वसंत मोरे यांनी सांगितले आहे. सध्या राज ठाकरे पुण्यात आहेत.  नगरसेवक वसंत मोरे यांनी हनुमानाची महाआरती केली होती. मात्र यावेळी राज ठाकरे हजर नव्हते. आता राज ठाकरे मुंबईला निघण्याआधी वसंत मोरे त्यांनी त्यांची भेट घेतली. राज ठाकरे  यांनी आपले कौतुक केले, असे वसंत मोरे म्हणाले.