कोल्हापुरात विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस

कोल्हापूर शहरात बुधवारी विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस झाला. एका रात्रीत या शहरात उच्चांकी 80 मिलिमीटर पाऊस झाला. 

Updated: Sep 14, 2017, 11:00 AM IST
कोल्हापुरात विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस title=

कोल्हापूऱ : कोल्हापूर शहरात बुधवारी विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस झाला. एका रात्रीत या शहरात उच्चांकी 80 मिलिमीटर पाऊस झाला. 

रात्रभर झालेल्या पावसामुळे शहराच्या सखळ भागात पाणी शिरलं. शहरात पाणी घुसल्यामुळं अनेक गाड्या वाहून गेल्यात. यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी घुसले.

शहरात आतापर्यंत 200 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. रात्रभर विजांच्या कडकडाटसह झालेल्या जोरदार पावसामुळे रामानंद नगर, वर्षा नगर, राजेंद्र नगर भागातल्या अनेक घरांमध्येही पाणी शिरलंय.