मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली असली तरी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि रायगडमध्ये पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. रायगडमध्ये देखील पावसाचा जोर वाढलाय.
महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यात पावसाची धुवांधार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीत काही भागात पाणी साचले आहे. नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
महाडसह पोलादपूर, माणगाव, म्हसळा तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. संपूर्ण जून महिन्यात अत्यंत कमी पाऊस झाल्यानंतर आज पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू आहे. नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
4 Jul: पुढील 5 दिवसांत मध्य भारत,पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय मान्सूनची स्थिती.
मान्सून TROUGH सक्रिय,पश्चिम किनारपट्टीवरील जोरदार वारे.
कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओडिशा व लगतच्या दक्षिण झारखंड व GWB वर.
याचा परिणामी महाराष्ट्रात येत्या ५ दिवसात पावसाचा इशारा.
TC,watch IMD pl
1/2 pic.twitter.com/B2XLShlrrK— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 4, 2022
हवामान खात्याने पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनानेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.