राज्यात जोरदार पावसाचा इशारा, या ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्ट

Heavy rain warning in Maharashtra : राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Updated: Jun 25, 2022, 07:48 AM IST
राज्यात जोरदार पावसाचा इशारा, या ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्ट title=

मुंबई : Heavy rain warning in Maharashtra : राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी राज्यात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अद्याप पावसाने दडी मारलेली दिसून येत आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. काही ठिकाणी अद्याप पेरणी करण्यात आलेली नाही. तर काही ठिकाणी पाणीटंचाईची समस्या कायम आहे. आता जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह कोकण भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुढील 5 दिवसात राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

जोरदार पावसाचा इशारा  

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येथील नागरिकांना सतर्क राहण्याचे इशारा देण्यात आला आहे. कोकणात ऑरेंज असणार आहे. तर ठाणे, पालघर, मुंबई, रायगड या जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

तर मध्य महाराष्ट्रात नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर येथे विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर येथेही चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.

मराठवाडामधील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली येथे पाऊस होईल. तर विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सटाणा तालुक्यात जोरदार पाऊस

नाशिकच्या सटाणा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळं मुंजवाडच्या कांदा व्यावसायिक राजेंद्र जाधव यांच्या कांदा शेडमध्ये पाणी घुसल्यानं साठवलेला 12 ट्रॅक्टर कांदा वाहून गेलाय. तर शेतकरी भास्कर सोनवणे यांचांही 50 क्विंटल कांदा वाहून गेलाय. पावसानं यांचं अतोनात नुकसान केलंय. त्यामुळं शासनानं तातडीनं दखल घेऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.

वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळी पिकाचे नुकसान

अकोला जिल्ह्यातील रुईखेड इथे झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात मोठ्या नुकसान झालंय..शासनाने या भागाचा सर्व्हे करुन पणज मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.. या भागात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते..या नुकसानीमुळे येथील शेतकरी हवालदिल झालेत.