Maharashtra Rain Update: राज्यात पावसाने (Rain Update) गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलै महिन्याची सुरुवातही पावसाने होणार आहे. शनिवारीही मुंबईमध्ये (Mumbai Rain) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील पाच दिवसही राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Rain Update Today)
जूनमहिन्यात मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. गेल्या आठवडाभरापासून मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. घाटमाथ्याच्या पूर्व-पश्चिम क्षेत्रातच मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यात मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याची चिन्हे आहेत. आठ जिल्ह्यात अद्याप पाऊस झाला नाहीये. त्यामुळं बळीराजांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जोरदार तर विदर्भात मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकणासह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रीय झाला आहे. मुंबई, ठाणे आणि संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर आज पावसाचा अंदाज आहे. येत्या 5 दिवसात राज्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता असून 2 जुलैपासून मुसळधार पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता, त्याचा प्रभाव दक्षिण भारतातील भागांत व संलग्न भागावर होण्याची शक्यता. राज्यातही 4, 5 दिवशी त्याचा प्रभाव असेल.
जून महिन्यात महाराष्ट्रात 46 टक्के पाऊस झाला आहे. तर, जुलैमध्ये मान्सून अधिक प्रगती करेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वसई विरार मध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून या पावसामुळे नालासोपाऱ्यात एका धोकादायक इमारतीची गॅलरी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
रायगडमध्ये कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. खोपोली, पेण, पाली परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे. पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचल्याचेही वृत्त आहे. आजसाठी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने पेरणीची लगबग सुरू झालीये. पहिल्याच पावसानंतर आता कृषी केंद्रांवरही खतं आणि बियाणं खरेदी करण्यासाठी शेतक-यांची गर्दी दिसून येतेय. मात्र काही भागात पाऊस कमी झालाय. त्यामुळे त्या भागाती शेतक-यांनी पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय.