राज्यात गारपीट नंतर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, पाहा कोणत्या जिल्ह्यांना धोका

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यात, पाहा कोणत्या जिल्ह्यात कसा आहे हवामान विभागाचा अंदाज?

Updated: Jan 5, 2022, 04:36 PM IST
राज्यात गारपीट नंतर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, पाहा कोणत्या जिल्ह्यांना धोका title=

मुंबई : ऐन थंडीच्या हंगामात आता पाऊस खो घालणार असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात 6 ते 9 जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता आहे. 6 जानेवारीला धुळे आणि नंदुरबारमध्ये पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

7 जानेवारीला धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगरमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 8 जानेवारी रोजी ठाणे पालघर, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हलका पाऊस पडणार आहे. 9 जानेवारीला मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठवाडा विदर्भातल्या काही भागात पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऐन थंडीमध्ये पुन्हा पाऊस खो घालणार असल्यानं शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. 8 - 9 जानेवारी, विशेषत: विदर्भाच्या काही भागांवर आणि मराठवाड्याच्या लगतच्या भागांवर प्रभाव जास्त असू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

गारपीटमुळे आधीच बागायतदार आणि खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट असल्याने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.