राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, या ठिकाणी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी

विदर्भासह राज्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. (Heavy rains in many places in Maharashtra,) दडी मारल्यानंतर पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. 

Updated: Aug 18, 2021, 07:50 AM IST
राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, या ठिकाणी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी title=

मुंबई : विदर्भासह राज्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. (Heavy rains in many places in Maharashtra,) दडी मारल्यानंतर पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हवामान विभागाने यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पावसाचे दमदार कमबॅक, शेतकऱ्याला मोठा दिलासा 

पावसाचे राज्यात दमदार कमबॅक झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुफान पाऊस झाला आहे. परभणी, नांदेड, अकोला, वर्धा, भंडाऱ्यामध्ये तुफान पाऊस झाला आहे. जवळपास महिनाभरानंतर पाऊस बसरला आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली होती. पण या पावसाने शेतकऱ्याला मोठा दिलासा दिला आहे. 

गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना महापूराचा फटका बसला होता. आता पुन्हा राज्यात मुसळधार पाऊस पडण्यााच अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार पाऊस सुरु झाला आहे. आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  तसेच मराठवाडा, कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जुलै महिन्यात झालेल्या पावसाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. त्यातही महाड, चिपळूणसारख्या शहरांचे महापुरामुळे मोठे नुकसान झाले होते.  तर कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. खान्देश आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुलनेने पाऊस कमी झाला आहे.