मुंबईत मुसळधार, पण राज्यातील अनेक भागात पावसाची ओढ

मुंबई आणि परिसराला पाऊस झोडपून काढत असला तरी महाराष्ट्रातील अनेक भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही.

Updated: Jul 19, 2021, 05:51 PM IST
मुंबईत मुसळधार, पण राज्यातील अनेक भागात पावसाची ओढ title=

मुंबई : मुंबई आणि परिसराला पाऊस झोडपून काढत असला तरी महाराष्ट्रातील अनेक भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढलेली आहे. जुलै महिना अर्धा संपला तरी राज्याच्या अनेक तालुक्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पावसाने अशीच पाठ फिरवली तर पिण्याच्या पाण्याची समस्याही उद्भवू शकते.

राज्यातील 13 तालुक्यात 25 ते 50 टक्केच पाऊस झाला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील 5 तालुके आणि नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुक्यांचा समावेश आहे. 33 तालुक्यात 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे. तर 309 तालुक्यात 75 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेले आहे.

सर्वात कमी पाऊस नंदुरबार जिल्ह्यात - 31 टक्के, नाशिक जिल्ह्यात - 60 टक्के, तर पुणे जिल्ह्यात 71 टक्के इतका झाला आहे.

तर सरासरीच्या 150 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस जालना, परभणी, नांदेड, बीड, रत्नागिरी अशा पाच जिल्ह्यातच झाला आहे.