close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जायकवाडी धरण परिसराला अतिदक्षतेचा इशारा

धरण परिसरातल्या सुरक्षेत वाढ

Updated: Aug 25, 2019, 05:36 PM IST
जायकवाडी धरण परिसराला अतिदक्षतेचा इशारा

औरंगाबाद : औरंगाबादच्या पैठण इथल्या जायकवाडी धरणावर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाला धरणावरील सुरक्षा वाढवा असे सांगितले आहे. मात्र नक्की कोणत्या कारणासाठी हा इशारा दिला हे समजू शकले नाही. 

मात्र सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तसेच पर्यटकांना काही विशेष ठिकाणी जाण्यावर बंदी सुद्धा घालण्यात आलेली आहे.

जायकवाडी धरण भरल्यावर तिथे हाय अलर्ट घोषित करण्यात येतो, त्याचप्रमाणे याही वर्षी हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे असे म्हटले जाते, दरम्यान याबाबत पोलिसानी पाटबंधारे प्रशासनाला पत्र पाठवून सुरक्षा वाढवण्यास सांगितलं आहे.