लग्न जमत नव्हते म्हणून तरुण चिंतेत, नैराश्यातून उचलले भयंकर पाऊल..; हिंगोलीतील घटना

Hingoli News Today: हिंगोली येथे एका तरुणाने लग्न जमत नसल्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 17, 2024, 05:49 PM IST
 लग्न जमत नव्हते म्हणून तरुण चिंतेत, नैराश्यातून उचलले भयंकर पाऊल..; हिंगोलीतील घटना title=
hingoli youth depressed about his marriage commits suicide

Hingoli News Today: ग्रामीण भागात मुलांचे लग्न जुळत नसल्याने उपवर तरुण नैराश्याच्या गर्तेत सापडल्याची माहिती समोर येत आहे. लग्न जमत नसल्याने हिंगोलीत 31 वर्षीय तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, तरुणाने हे धक्कादायक पाऊल उचलल्याने कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. हिंगोलीच्या जामठी गावातील ही धक्कादायक घटना घडली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, तरुणाचे लग्न जमत नसल्याने तो चिंतेत होता. त्यानंतर विजेचा प्रवाह वाहून नेणाऱ्या काळ्या केबलने स्वतःला गळफास लावून घेत या युवकाने आत्महत्या केली आहे. नामदेव जाधव अस या आत्महत्या केलेल्या तरुणाच नाव असून लग्न जमत नसल्याने तो नैराश्यात होता. म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते. गोरेगाव पोलीस ठाण्यात त्यांच्या मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. 

केवळ एकमेकांकडे बघण्याच्या रागातून एकाची हत्या 

केवळ एकमेकांकडे बघण्याच्या रागातून एकाची हत्या झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. डहाणूकर कॉलनी परिसरातील ही घटना आहे. श्रीनु बिसलावत असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मारेकरी आणि त्याच्यात महिनाभरापूर्वी वाद झाला होता. त्याचा राग मनात ठेवून सहा जणांनी त्याची कोयत्याने वार करून हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी सहाही आरोपींना अटक केली आहे. 

हिंगोलीत भरपावसात लग्न

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी भरपावसात एक लग्न उरकण्याची वेळ वेळ वधू पित्यावर अवकाळी पावसामुळे आली. दांडेगाव येथे काल सायंकाळी कदम आणि साळुंके परिवारात लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता पण सायंकाळी अवकाळी पाऊस आल्याने भर पावसात वधू वरांना स्टेजवर एन्ट्री करावी लागली. अवकाळी पावसामुळे वऱ्हाडीची चांगलीच धावपळ झाली, डोक्यावर, खुर्चा, चटई घेऊन वऱ्हाडींनी वधू वरांवर अक्षदा टाकल्या. हिंगोलीच्या दांडेगावात असा भर पावसात विवाह पार पडला. यावेळी उपस्थितांची चांगलाच गोंधळ उडाला.