Side effects of Turmeric Milk: हळदीचे दूध हे बऱ्याच आरोग्यासंबंधी समस्यांवर उत्तम उपाय मानला जातो. भारतातील जवळपास सर्वच घरात हळदीच्या दूधाचं सेवन केलं जातं. दूधामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व असतात त्यामुळे दूध हे एक पूर्ण अन्न मानलं जातं. आरोग्यासाठी दूधाचे सेवन खूपच फायदेशीर ठरते. तसेच हळदीमध्ये बरेचसे औषधी गुणधर्म असतात. हळदीचा वापर मसाले म्हणून करण्यासोबतच कोणत्याही जखमेपासून त्वरीत आराम मिळवण्यासाठी घरगुती उपचार म्हणूनही वापर केला जातो. हळदीची हीलिंग पावर खूपच चांगली असते. त्यामुळे आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत होते. परंतु, हळदीच्या दूधाचे सेवन हे शरीरासाठी घातक सुद्धा ठरु शकते.
गर्भवतींना हळदीचे दूध धोकादायक असते. कारण हळद उष्ण असते. त्यामुळे हळदीच्या सेवनामुळे पोटात उष्णता निर्माण होऊ शकते. पोटातील उष्णता हे गर्भपातासाठी कारणीभूत ठरु शकतं. म्हणून गर्भवतींनी हळदीच्या दूधाचे सेवन करणे टाळावे.
लिव्हरसाठी घातक
हळदीचं दूध लिव्हरसाठी सुद्धा घातक ठरु शकते. लिव्हर हा शरीराचा प्रमुख अवयव आहे. विशेषत: उष्ण पदार्थ शरीरातील मुख्य भागांना धोका पोहचवू शकतात. त्यामुळे हळदीचे दूध लिव्हर कमकुवत होण्यास कारणीभूत ठरू शकते.
पोटासंबंधी समस्या
जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त म्हणजेच एक चमच्याहून अधिक हळद टाकून सेवन केले तर पोटासंबंधी आजार उद्भवण्याची शक्यता असते. स्टोनच्या आजाराने ग्रासलेल्या लोकांनी हळदीचे दूध पिणं टाळलं पाहिजे. हळदीमधील ऑक्सलेटमुळे कॅल्शियम विरघळताना अडचणी निर्माण होऊ शकतात. यामुळे किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. उन्हाळ्यात हळदीच्या दूधाचे सेवन कमी करायला हवे.
डायबिटीज रुग्णांसाठी धोकादायक
डायबिटीजचा सामना करणाऱ्या लोकांना खाण्या-पिण्यासंबंधी बरीच पथ्ये पाळावी लागतात. पथ्ये न पाळल्याने ब्लड शूगरच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकते. हळद मधुमेह असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरते कारण हळदीचे सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना नाकातून रक्त येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा लोकांनी कमी प्रमाणात हळदीचे सेवन करायला हवे.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)