दिल्लीतील अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण शांत होत नाही तोच आणखी एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केली आहे. दिल्लीत मॉडेल टाऊन परिसरात पुनीत खुरानाने आत्महत्या केली. या प्रकरणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये पुनीत खुरानाने सासरे जगदीश पावा यांच्यात चर्चा होत असल्याच दिसत आहे. हा व्हिडीओ 12 ऑक्टोबर 2023 रोजीचा असून यामध्ये पुनीतचे सासरे घराच्या बदल्यात 2 कोटी रुपयांची मागणी करताना दिसत आहे. पण नंतर सासरे आपलाच शब्द फिरवतात. पीडित कुटुंबाच्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा पुनीत याच गोष्टीमुळे दबावात होता. पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे की, त्याच्या सासरची मंडळी अनेकदा त्याला धमकी देत असतं.
#AtulSubhash के बाद अब नोएडा के पुनीत ने भी पत्नी से परेशान होकर वीडियो बनाया और आत्महत्या कर ली। पत्नी से परेशान कितने पति करेंगे आत्महत्या?#Noida #PunitKhurana pic.twitter.com/HDvcgLgNXi
— Sujeet Swami️ (@shibbu87) January 2, 2025
या प्रकरणात पुनीत खुराना आणि त्याचे सासरे यांच्यात चर्चा झाल्याचं दिसत आहे. ऑडियोमध्ये पीडित कुटुंबाने दावा केला आहे की, पुनीतचे सासरे जवळपास वर्षभर त्याला मानसिक त्रास देत होते.
पीडित कुटुंबाने पोलिसांनी सांगितलं की, पुनीत आणि त्याचे सासरे यांच्यात जेव्हापण बोलणं व्हायचं तेव्हा अनेकदा त्याचे सासरे अनेकदा शब्द द्यायचे. पण नंतर पुनीत त्या विषयावर बोलू लागला की, ते आपला शब्द पूर्णपणे विसरुन जायचे. आपल्या सासऱ्या या वर्तणुकीला पुनीत कंटाळला होता. त्याच्या या त्रासाबद्दल त्याने अनेकदा घरी देखील सांगितलं होतं.
पुनीत खुराना आत्महत्या प्रकरणात, पीडितेच्या कुटुंबीयांनी असे अनेक पुरावे दिल्ली पोलिसांसमोर सादर केले आहेत, जे पाहून असे समजते की पुनीत खुराना आणि त्याच्या सासरच्या लोकांमध्ये गेल्या वर्षभरात सर्व काही ठीक चालले नव्हते. पीडितेच्या कुटुंबीयांनी अनेक व्हिडिओ आणि ऑडिओ पुरावेही पोलिसांना दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी पुनीत खुराना आणि त्याची पत्नी यांच्यातील संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंगही समोर आली होती. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये मनिका 'भिखारी, तू काय मागितलंस ते सांग. तूला यापुढे तुम्ही म्हणण्याची लायकी नाही. मला तुझा चेहरा बघायचा नाही. तू माझ्यासमोर आला तर मी तुला कानाखाली मारेन. घटस्फोट होत असेल तर तू मला व्यवसायातून थोडे काढून टाकशील, मग तू मला धमकी दिलीस तर मी आत्महत्या करेन, असे सांगितले. या फोन कॉलनंतर दिल्लीच्या मॉडेल टाऊन भागात राहणाऱ्या पुनीत खुरानानेही बेंगळुरूच्या अतुल सुभाषप्रमाणेच टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. पुनीतच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मनिकाशी फोनवर बोलल्यानंतर त्यांच्या मुलाने फोनवर एक व्हिडिओ रेकॉर्डिंग केला ज्यामध्ये त्याने पत्नी मनिका पाहवा आणि तिच्या कुटुंबीयांवर तिची मालमत्ता आणि व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला .