आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश, देशविरोधी घातपाताचा डाव उधळला?

रत्नागिरी (Ratnagiri) बाजारपेठेत आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा (International Call Centre) पर्दाफाश झाला आहे.  

Updated: Aug 14, 2021, 09:56 PM IST
आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश, देशविरोधी घातपाताचा डाव उधळला? title=

प्रणव पोळेकर, झी २४ तास, रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी (Ratnagiri) बाजारपेठेत आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा (International Call Centre) पर्दाफाश झाला आहे. याबाबत दोघांना अटक झाली आहे. या प्रकरणावर एटीएसचं (Anti-Terrorism Squad) बारीक लक्ष आहे. स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पूर्वसंध्येला कारवाई झाल्यानं कारवाईचं गांभीर्य वाढलं आहे. (illegal international call center has been busted in Ratnagiri 2 were arrested along with the mastermind from market area) 

दहशतवादी कारवायांवर करडी नजर असलेल्या मुंबई एटीएसनं एक नवं रॅकेट उद्ध्वस्त केलंय. रत्नागिरीतून विविध देशांमध्ये संपर्क करण्यासाठी बेकायदा यंत्रणा उभारण्यात आल्याचं धक्कादायक बाब समोर आलीय. विशेष म्हणजे रत्नागिरीत सर्व्हर असलेल्या या कॉल सेंटरचं काम मुंबईतल्या वांद्र्यातून सुरू होतं. कितीही मोठा गुन्हेगार असला तरी एक चूक करतोच. आणि अशीच चूक या कॉलसेंटरच्या सूत्रधारांनी केली. आणि ते एटीएसच्या जाळ्यात अडकले. हे कॉल सेंटर थाटलेल्या मोबाईल दुकानदाराला आणि पनवेलमधल्या मुख्य सुत्रधाराला बेड्या ठोकण्यात आल्या. 

आंतरराष्ट्रीय कॉल करण्यास परवानगी आहे. आयपी म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेसवरून दुसऱ्या आयपी अॅड्रेसवर कॉल केला जातो. सुरक्षेच्यादृष्टीने हे सर्व कॉल ट्रेस केले जातात. मात्र आयपी अॅड्रेस टू मोबाईल किंवा आयपी अॅड्रेस टू लॅण्डलाईन कॉल केल्यास ते ट्रेस होत नाहीत. दहशतवादी याचाच फायदा घेतात आणि रेंज नसते तेव्हा या यंत्रणेचा वापर करतात.

अशा अवैध पद्धतीनं हे आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरू करण्या मागचा काय हेतू होता? कधीपासून हा सर्व प्रकार सुरू होता? देशविरोधी कारवायांसाठी या सेंटरमधून संपर्क साधला जात होता का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर एसटीएस तपासातून समोर येणार आहेत.