Remarriage : लेक असावा तर असा; एकटेपणा घालवण्यासाठी मुलानेच लाऊन दिले आईचे दुसरे लग्न

वडिलांच्या निधनानंतर मुलानेच आईचा विवाह लावून दिल्याची घटना यापूर्वी कधीच ऐकायला मिळाली नव्हती. पण, कोल्हापूरच्या युवराजने समाज प्रबोधनाचे आणखी एक पाऊल पुढे टाकत आपल्या आईचा विवाह लावून दिला आहे.

Updated: Jan 14, 2023, 07:05 PM IST
Remarriage : लेक असावा तर असा;  एकटेपणा घालवण्यासाठी मुलानेच लाऊन दिले आईचे दुसरे लग्न  title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर: कोल्हापुर (Kolhapur) मधील एका तरुणाने आईचा एकटेपणा घालवण्यासाठी मुलाने आईचा विवाह लावून दिला  (mother second marriage). विधवा बंदीचा मुहूर्तमेढ रोवणाऱ्या कोल्हापुरात आणखी एक समाज परिवर्तनाचे पाऊल पुढे आहे. मुलाने आईसाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुलामुळे या महिलेला चौकटीबाहेर जाऊन नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची संधी मिळाली आहे (Remarriage).

पतीच्या मृत्यूनंतर लग्न केलं तर समाज काय म्हणेल या विचाराने अनेक महिला आयुष्यभर विधवा राहणे पसंद करतात. पण, काही वडील, काही सासू सासरे हे विधवा झालेल्या मुलीच लग्न लावून देण्यासाठी पुढाकार घेतात. पण, वडिलांच्या निधनानंतर मुलानेच आईचा विवाह लावून दिल्याची घटना यापूर्वी कधीच ऐकायला मिळाली नव्हती. पण, कोल्हापूरच्या युवराजने समाज प्रबोधनाचे आणखी एक पाऊल पुढे टाकत आपल्या आईचा विवाह लावून दिला आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीतील हेरवाड ग्रामपंचायतीने संपूर्ण देशाला आदर्श घालून देणारा विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला. या ऐतिहासिक निर्णयाची महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याने सुद्धा दखल घेत याची राज्यभरातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. ही घटना ताजी असताना शाहूच्या नगरीत युवराज शेले या 23 वर्षीय युवकाने वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या आईचा एकटेपणा घालवण्यासाठी आईचा दुसरा विवाह लावून दिला आहे. 
समाज काय म्हणेल यापेक्षा आईचा एकटेपणा घालवणे माझ्यासाठी महत्त्वाचं होते. त्यामुळे मी हे पाऊल उचललं असं युवराजचं शेले याचे म्हणणं आहे.

वडील गेल्यानंतर एकुलत्या एक युवराज आपल्या आईला विधवेच जीवन जगू नकोस कुंकू लाव मंगळसूत्र घालत जा अशा प्रकारचा हट्ट धरत होता. तरी देखील आईने समाज काय म्हणेल अस सांगत युवराजला टाळत होती, पण सोंगी भजन कार्यक्रमाच्या निमित्ताने युवराज बाहेरगावी जात असल्याने आई सोबत कोणीतरी आपलं असावं असा विचार युवराजच्या मनात सतत रेंगाळत होता, त्यातूनच आईने घटस्फोट घेतलेले काका मारुती व्हटकर यांच्याबरोबर विवाह करावा अस सुचविले. पण तरी देखील आई तयार न्हवती, शेवटी मुलाचा तगादा पाहून आईने शेजारी असणाऱ्या महिलांना युवराज लग्न कर असा मागे लागला असल्याचं बोलून दाखविले. त्यावेळी शेजारील महिलांनी देखील मुलगा म्हणत असेल तर काय हरकत नाही अस भूमिका मांडली.

रूढी परंपरा जुगारून युवराजने घरच्या घरी आपल्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईक यांना सोबत घेवून लग्न लावून दिल. एरवी एकाद्या पुरुषाची बायकोच निधन झालं तर त्या पुरुषांला झालं गेलं विसरून जा आणि लग्न कर असा सल्ला देतात. तसाच सल्ला मी माज्या आईला दिला यात काय चुकीचे अस युवराजचे म्हणणे आहे. त्यामुळेच गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या युवराजच्या विचारांची श्रीमंती सध्या अनेकांना भावताना दिसत आहे.