मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update) वाढ झाली होती. या रुग्णसंख्येत आज (19 जुलै) मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ही दुप्पट झाली आहे. त्यामुळे रिकव्हरी रेटमध्येही वाढ झाली आहे. तसेच मृत्यूसंख्येत ही घट झाली आहे. राज्यात आज एकूण 6 हजार 17 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. दिवसभरात एकूण 13 हजार 51 जण कोरोनामुक्त झाले आहे. (In Maharashtra Today 19 July 2021 6 thousand 17 corona patients found)
#Maharashtra #COVID19 Updates for today
New Cases- 6,017
Recoveries- 13,051
Deaths- 66
Active Cases- 96,375
Total Cases till date- 62,20,207
Total Recoveries till date- 59,93,401
Total Deaths till date- 1,27,097
Total tests till date- 4,56,48,898(1/4)
— PIB in Maharashtra (@PIBMumbai) July 19, 2021
राज्यात आतापर्यंत एकूण 59 लाख 93 हजार 401 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्याच्या रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा आता 96.35 % इतका झालाय.
किती जणांचा मृत्यू
राज्यात कोरोनामुळे 24 तासांमध्ये 66 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर हा 2.04% इतका आहे. सध्या राज्यात 5 लाख 61 हजार 796 व्यक्ती होम क्वारटाईन आहेत तर. 4 हजार 52 व्यक्ती संस्थातमक विलिगिकरणात आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 96 हजार 375 सक्रीय रुग्ण आहेत.
मुंबईतील कोरोना
मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. दिवसभरात एकूण 402 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर 577 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
#CoronavirusUpdates
१९ जुलै, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण - ४०२
२४ तासात बरे झालेले रुग्ण - ५७७
बरे झालेले एकूण रुग्ण - ७०७१२९
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९७%एकूण सक्रिय रुग्ण- ६३४९
दुप्पटीचा दर- १०३४ दिवस
कोविड वाढीचा दर (१२ जुलै ते १८ जुलै)- ०.०६% #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 19, 2021