Maharashtra Corona | राज्यातील कोरोना रुग्णांसह मृतांच्या आकड्यातही वाढ, तुमच्या जिल्ह्यात किती पॉझिटिव्ह?

कोरोना रुग्णसंख्येत  (Maharashtra Corona Update) वाढ झाली आहे. तर मृतांचा आकडाही वाढलाय.  

Updated: Jul 28, 2021, 09:54 PM IST
Maharashtra Corona | राज्यातील कोरोना रुग्णांसह मृतांच्या आकड्यातही वाढ, तुमच्या जिल्ह्यात किती पॉझिटिव्ह?

मुंबई : राज्यातील कोरोनाची (Maharashtra Corona Update) आजची (28 July)  आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तर मृतांचा आकडाही वाढलाय. तसेच रिकव्हरी रेटमध्येही  (Recovery Rate) घट झालीय. चिंताजनक बाब म्हणजे दिवस भरात कोरोना मुक्त झालेल्यांपेक्षा बाधित रुग्णांचा आकडा हा जास्त आहे. महाराष्ट्रात दिवसभरात एकूण 6 हजार 857 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. (in maharashtra today 28 july 2021 6 thousand 857 new corona patients Found)

कोरोनामुक्त किती?

दिवसभरात एकूण 6 हजार 105 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  त्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्रातील एकूण 60 लाख 64 हजार 856 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे  (Recovery Rate)  प्रमाण हे 96.53 इतके झाले आहेत.   

मृतांचा आकडा

कोरोनामुळे राज्यात दिवसभरात 286 जण दगावले आहेत. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस किंचीत स्वरुपात मात्र वाढ होतेय. त्यामळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्याच्या सध्याचा मृत्यू दर हा 2.01% इतका आहे.  

मुंबईतील कोरोना आकडेवारी...

मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 404  नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 382 जण कोरोनामुक्त झाले आहेत.