मुंबई : राज्यात आज (28 जून) कोरोना आकडेवारी (Maharashtra Corona Update) समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज 9 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत होते. पण यामध्ये आता घट झालेली आहे. त्यामुळे राज्याला थोड्या प्रमाणात काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 6 हजार 727 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. आजची आकडेवारी ही कालच्या तुलनेत 2 हजारांनी कमी आहे. 27 जूनला राज्यामध्ये 9 हजार 974 रुग्ण सापडले होते. (In Maharashtra today 28 June 2021 6 thousand 727 new corona patient found)
दिवसभरात किती रुग्ण बरे?
गेल्या 24 तासांमध्ये 10 हजार 812 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 58 लाख 925 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) वधारला आहे. हा दर आता 95.99 टक्क्यांवर पोहचला आहे.
किती जणांचा मृत्यू?
रुग्णसंख्येच्या घटीसह मृतांच्या संख्येतही घट झाली आहे. दिवसभरात 101 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर हा आता 2.1 टक्के इतका झाला आहे.
मुंबईत किती रुग्ण?
मुंबईच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. मुंबईत 24 तासांमध्ये 608 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 714 जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण 6 लाख 94 हजार 796 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रुग्ण बरे होण्याचा दर हा 96 टक्के इतका झाला आहे. मुंबईत आजमितीस 8 हजार 453 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
#CoronavirusUpdates
२८ जून, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण - ६०८
२४ तासात बरे झालेले रुग्ण - ७१४
बरे झालेले एकूण रुग्ण - ६९४७९६
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९६%एकूण सक्रिय रुग्ण- ८४५३
दुप्पटीचा दर- ७२८ दिवस
कोविड वाढीचा दर ( २१ जून ते २७ जून)- ०.०९ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 28, 2021
रुग्णसंख्या कमी पण धोका कायम
राज्याच्या रुग्णसंख्येत 24 तासात 2 हजारांनी घट झालीये. त्यामुळे ही राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बाब आहे. पण तिसऱ्या लाटेचा धोका हा अजूनही कायम आहे. त्यामुळे खबरदाराची उपाय म्हणून राज्य सरकारने आजपासून निर्बंध पुन्हा कडक केले आहे. त्यानुसार राज्यभरात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू राहणार आहेत.
संबंधित बातम्या :
'व्यापारी म्हणतात, कोरोनासे नही साहब, लॉकडाऊन से डर लगता है!'
लॉकडाऊच्या मुद्यावर व्यापारी - सरकार आमने सामने
Maharashtra Lockdown : राज्यात आजपासून पुन्हा कडक निर्बंध; काय सुरू काय बंद?