Pune News : पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घरात झोपलेल्या मुलाला उठावायला अग्निशमन दलाला बोलवायला लागले. जवळपास तासाभरानंतर या मुलाला जाग आली. या मुलाला उठवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानांना दरवाजा कापावा लागला. कुंभकरणाप्रमाणे झोपी गेलेल्या या मुलाची जोरदार चर्चा रंगली आहे.
घरात गाढ झोपत झोपलेल्या मुलाला उठविण्यासाठी चक्क अग्निशमन दलाची मदत पिंपरी चिंचवड शहरात घेण्यात आली. यशोमंगल हाउसिंग सोसायटीत सचिन शेवाळे यांचा बारा वर्षाचा अथर्व शेवाळे मुलगा झोपला होता..तासभर घराची बेल वाजवूनही मुलगा उठत नसल्याने अग्निशमन दलाच्या साह्याने सेफ्टी डोअरचं लॉक कट करून दरवाजा उघडण्यात आला. आत प्रवेश करून त्यांच्या गाढ झोपेत असलेल्या मुलाला उठवले.. मुलगा गाढ झोपेतून सुखरूप उठल्यानंतर पालकांनी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुट्टकेचा श्वास घेतला.
यशोमंगल हाउसिंग सोसायटीत, तिसऱ्या मजल्यावर सचिन शेवाळे यांचा घर आहे. या घरात सचिन शेवाळे यांचा बारा वर्षाचा अथर्व शेवाळे हा मुलगा काल घरात कुणी नसताना गाढ झोपेत झोपलेला होता. सचिन शेवाळे हे घरी आल्यानंतर त्यांनी जवळपास तासभर घराच्या दाराला ठोकावत तसेच घराची बेल वाजवत आपल्या मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगा गाढ झोपेतून उठतच नव्हता. आपल्या मुलाला काही बरं - वाईट तर झालं नाही ना? याची सारखी चिंता शेवाळे यांना भेडसावत होती. त्यामुळे त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला झालेला प्रकारची माहिती दिली.. त्यानंतर अग्निशमन दलान तातडीन घटनास्थळी दाखल सेफ्टी डोअरचं लॉक कट करून दरवाजा उघडला आणि आत प्रवेश करून त्यांच्या गाढ झोपेत असलेल्या मुलाला उठवले.. मुलगा गाढ झोपेतून सुखरूप उठल्यानंतर पालकांनी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुट्टकेचा श्वास घेतला...