तब्बल 87 वर्षानंतर ठाण्यात डबल डेकर बस धावणार; प्रवाशांची गर्दीतुन सुटका

मुंबईकरांप्रमाणेच आता ठाणेकरही डबल डेकर बसने प्रवास करणार आहेत. तब्बल 87 वर्षानंतर ठाण्यात डबल डेकर बस धावणार आहेत. ठाणेकरांच्या सेवेत आता 10 डबल डेकर बस रूजू होणार आहेत. या अतिरीक्त बसेसमुळे प्रवाशांची गर्दीतुन सुटका होणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 6, 2024, 06:50 PM IST
तब्बल 87 वर्षानंतर ठाण्यात डबल डेकर बस धावणार; प्रवाशांची गर्दीतुन सुटका title=

Thane Double Decker Bus : मुंबईकरांप्रमाणेच आता ठाणेकरही डबल डेकर बसने प्रवास करणार आहेत. तब्बल 87 वर्षानंतर ठाण्यात डबल डेकर बस धावणार आहेत. ठाणेकरांच्या सेवेत आता 10 डबल डेकर बस रूजू होणार आहेत. या अतिरीक्त बसेसमुळे प्रवाशांची गर्दीतुन सुटका होणार आहे. 

ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात आत्तापर्यंत 123 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यात...उर्वरित 180 बसेस घेण्यासाठी परिवहन विभागाने निविदा मागवलीये...त्यातील 10 बसेस या डबलडेकर असणारेत...

ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत 123 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या असून उर्वरित 180 इलेक्ट्रिक एसी बस घेण्यासाठी परिवहन सेवेने निविदा मागवली आहे. त्यात 10 डबल डेकर बस समावेश असल्याने ठाणेकरांना डबल डेकरचा बसचा आनंद घेता येणार आहे. मुंबईत 1937 पासून म्हणजेच गेली 87 वर्षे डबल डेकर बस रस्त्यावर धावत आहे .तीच डबल डेकर बस ठाण्यात येण्याकरिता इतकी वर्ष ठाणेकरांना वाट पाहावी लागली.

पुण्यातही धावणार डबल डेकर बस

पुण्यात आता मुंबईप्रमाणे डबल डेकर बस धावणारेत. पीएमपी संचालकांच्या बैठकीत बस खरेदीला मान्यता मिळालीय. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणारेय. पीएमपी आणखी 100 नवीन इलेक्ट्रिक बसही खरेदी करणारेय. त्यातच 20 डबल डेकर बस असणारेत.त्यामुळे लवकरच पुण्यातील रस्त्यांवरही डबल डेकर बस धावणारेत.