मुंबई : भविष्यात पंधरा वर्षे राज्यात आपणच आहोत असा विश्वास कोल्हापूरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीचा मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे महत्वाचे नेते उपस्थित होते. पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारासाठी ही मंडळी एका मंचावर आली होती.
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेने कडून दगाबाजी होणार नाही हा शब्द संपर्क प्रमुख मी देतो असे शिवसेना आमदार उदय सामंत यांनी म्हटले.
अरुण लाड,जयंत आसगावकर यांचा विजय एकतर्फी आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार पदवीधर आणि शिक्षकांना न्याय मिळवून देतील. सरकारने शिक्षण क्षेत्रांत चांगलं काम करायचा प्रयत्न केल्याचे सामंत म्हणाले.
मागील काळात अनेक आदेश काढले आणि मागे घेतले गेले. या निवडणुकीत भाजपवाले जेवढ खोट बोलता येईल तेवढं बोलून आपलं दुकान चालवत आहेत. अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मागच्या पाच वर्षात सरकारने ६७ जीआर काढले गेले आणि नंतर ते मागे घेतले. ते का घेतलं या सांगण्याची गरज असल्याचा टोला उदय सामंत यांनी भाजपला लगावला. पदवीधर मतदार संघात मागील काही वर्षांत फक्त घोषणा झाल्या. आमचं सगळं व्यवस्थित ठरलं असेल तर भविष्यात पंधरा वर्षे राज्यात आपणच आहोत असा विश्वास सामंतांनी व्यक्त केला. तसेच कोकणातील लोक जेव्हड वाईट बोलतात तेवढं आमच चांगलं होत असा टोला त्यांनी नारायण राणेंना लगावला.
योग्य नियोजन केल तर विजय निश्चित आहे पण विरोधाकांच्या यंत्रणेला तोडीस तोड देणार काम करावं लागेल असे राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी म्हटलंय. कोरोनाला यशस्वी आणि समर्पक तोंड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी दिलंय असेही ते म्हणाले. भाजपचे उमेदवार म्हणतात २५ लाखांच अनुदान मिळवून देईन मग १२ वर्ष दादा गोट्या खेळत होते का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. १२ वर्ष ज्यांना संधी दिली त्यांनी एक ही काम केलं नाही. कशा प्रकारे सरकार जाईल याचा प्रयत्न भाजप कडुन सुरू आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बदनामीवर सतत भर दिल्याचेही मुश्रीफ म्हणाले. ऑपरेशन लोटस झालं आणि आमचा आमदार तिकडे गेला तर त्याच डोपॉझिट जप्त होईल असा इशाराही त्यांनी दिला.
मागच्या सहा वर्षात ज्यांना निवडून दिल त्यांनी पदवीधरासाठी काहिच काम केलं नाही याची जाणीव सर्वांना झालीय. तिन्ही पक्षानी एकत्र काम केलं तर विजय निश्चित असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील म्हणाले.
भाजप ची आर्थिक धोरण चुकत गेली. गेल्या ४५ वर्षातील मोठी बेरोजगारी भाजपच्या काळात आलीय असा टोला देखील जयंत पाटलांनी यावेळी लगावला. कोल्हापुरात दोन्ही उमेदवार योग्य आहेत.. त्यांच्यामागे आशीर्वाद असू द्या असे आवाहन जयंत पाटीलांनी यावेळी केले.