पुणे जिल्ह्यात साखर कारखाने, संचालकांच्या घरावर इन्कम टॅक्सचे छापे

 Income tax raids on sugar factories : आताची सगळ्यात मोठी बातमी. जिल्ह्यातील खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. 

Updated: Oct 7, 2021, 12:19 PM IST
पुणे जिल्ह्यात साखर कारखाने, संचालकांच्या घरावर इन्कम टॅक्सचे छापे
संग्रहित छाया

पुणे : Income tax raids on sugar factories : आताची सगळ्यात मोठी बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे ( Income tax raids) मारले आहे. जिल्ह्यातील दौंड शुगर, अंबालिका शुगर, जरंडेश्वर, पुष्पदनतेश्वर शुगर कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे.  (Income tax officials raid offices on sugar factories) यावेळी मोठी झडती करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यातील खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी ( Income tax raids) केली आहे. त्यांच्या हाती काय लागणार याची मोठी उत्सुकता आहे. आयकर विभागाने ही कारवाई सुरु केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दौंड शुगर, अंबालिका शुगर, जरंडेश्वर, पुष्पदनतेश्वर शुगर कारखान्यांवर छापे मारण्यात आले आहेत. तसेच खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरांची झडती घेण्यात येत आहे. (Income tax officials raid offices on sugar factories, directors' houses in Pune ) हे सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याचे सांगण्यात येत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर ही छापेमारी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. इन्कम टॅक्स विभागाने कारवाई करताना खासगी साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरीही छापे मारले आहेत. दौंड शुगर, आंबलीक शुगर, जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर या खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरांची झडती केली. मात्र, अधिक माहिती हाती मिळालेली नाही.

साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी काल बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे.