जळगाव : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ३५ ते ३८ डिग्री अंश सेल्सियसपर्यंत पोहचलाय. मार्च हिटचा प्रचंड तडाखा जाणवायला लागला असून वाढत्या तापमानापासून बचाव करणं आता नागरिकांसाठी गरजेचं आहे.
जळगावसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पारा सध्या वाढतोय, अंगाची लाही लाही करून सोडणाऱ्या कडक उन्हामुळे नागरिकांना दुपारी बाहेर पडणे जिकरीचे झालंय. उन्हाचा फटका बसत असल्याने नागरिकांना बाहेर पडताना पांढरे रुमाल, टोप्यांचा आश्रय घ्यावा लागला. तसंच शीतपेय घेऊन नागरिकांना उन्हापासून बचाव करावा लागतोय.
मार्च हिटने नागरिकांना बेचैन केलंय अजून मार्चमध्येच अशी स्थिती असेल तर मेच्या उन्हाचा तडाखा काय असले याने नागरिक आतापासूनच धास्तावलेय. मेंपर्यंत जळगाव जिल्ह्याचं तापमान ४७ ते ४८ डिग्री अंश सेल्सियस चा आकडा गाठेल, अशी भिती व्यक्त होतेय. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जळगावमधील काही तालुक्यात पाणीटंचाईचं भीषण सावट आहे.. पिण्याच्या पाण्याच्या योजनाच नसल्यानं गाव तसं चांगलं पण पाण्यावाचून भांगलं अशी स्थिती इथं आहे.