इंदुरीकर सम-विषम वाद | तृप्ती देसाईंना धमकी प्रकरणी स्मिता अष्टेकर पोलिसांच्या ताब्यात

हभप इंदुरीकर महाराज यांच्याकडून सम-विषम वादावर दिलगिरी व्यक्त केली असली. तरी

Updated: Feb 18, 2020, 03:08 PM IST
इंदुरीकर सम-विषम वाद | तृप्ती देसाईंना धमकी प्रकरणी स्मिता अष्टेकर पोलिसांच्या ताब्यात title=

अहमदनगर : हभप इंदुरीकर महाराज यांच्याकडून सम-विषम वादावर दिलगिरी व्यक्त केली असली. तरी आणखी शिवसैनिक स्मिता अष्टेकर आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यातील वाद अजून संपलेला नाही. तृप्ती देसाई यांना व्हिडीओ बनवून तो फेसबूकवर टाकून धमकी दिली होती, तृप्ती देसाई यांना अहमदनगरमध्ये येऊनच दाखवा, अशी धमकी अष्टेकर यांची होती, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी स्मिता अष्टेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. स्मिता अष्टेकर यांनी तृप्ती देसाई यांना मारहाणीची धमकी दिली होती, तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे.

दुसरीकडे स्मिता अष्टेकर यांनी तृप्ती देसाई यांना अहमदनगरमध्ये येऊनच दाखवा, धमकी दिल्यानंतर, तृप्ती देसाई यांनी पुन्हा इंदुरीकर यांना आव्हान दिलं होतं. स्मिता अष्टेकर यांनी तृप्ती देसाई यांना ज्या व्हिडीओतून धमकी दिली होती, त्यात त्यांनी हभप इंदुरीकर यांचं समर्थन केलं होतं.

दुसरीकडे इंदुरीकर यांनी जरी माफी मागितली असली तरी आपण त्यांच्याविरोधात तक्रार करणार आहोत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आपली भूमिका कायम असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

सम तारखेला संभोग केला तर मुलगा जन्माला येतो, आणि विषम तारखेला संभोग केला तर मुलगी जन्माला येते, असं वक्तव्य इंदुरीकर यांनी एका कीर्तनातून केल्यानंतर या वादाला सुरूवात झाली आहे. यानंतर इंदुरीकर यांनी हे आपलं मत नसून ग्रंथात हा उल्लेख असल्याचं म्हटलं होतं.