सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय.
खासदार उदयनराजे भोसले यांना हे सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याना अटक करण्यात आली. त्यांची वैद्यकीय चाचणी करून कायदेशीर अटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना पोलीस जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर उदयनराजे भोसले यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
दरम्यान, कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं उदयनराजे यांनी आवाहन केलं होते. मात्र, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खासदार उदयनराजे यांना कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
त्याआधी खासदार उदयनराजे समर्थक आणि सातारकरांकडून बाजार पेठेसह शहरातील दुकाने उत्स्फूर्तपणे बंद करण्यात आलीत. कॉ. नाना पाटील रुग्णालय, पोवईनाका आणि शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
एका उद्योगजकाला खंडणी मागितल्याप्रकरणी उदयनराजेंवर गुन्हा झाला होता. त्यावर कोर्टानं त्यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात चार महिन्यानंतर उदयनराजे साताऱ्यात दाखल झाले होते.