'या' कॉलेजच्या अधिष्ठाता विरोधात डॉ. लहाने यांची पोलीस तक्रार

 याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल कारण्यात आला

Updated: Jan 20, 2020, 09:22 PM IST
'या' कॉलेजच्या अधिष्ठाता विरोधात डॉ. लहाने यांची पोलीस तक्रार

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेंट जॉर्ज रुग्णालयाचे संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी इस्लामपूर येथील प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च संस्थेचा मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. वृषाली वाटवे यांच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. डॉ. तात्यासाहेब लहाने आणि त्यांच्यासमवेत असणाऱ्या दोन डॉक्टरांच्या चौकशी समितीस तपासणी करण्यास अटकाव कारण्यात आल्याची तक्रार दिली असून याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. भाजपाचे नेते आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे हे खाजगी मेडिकल कॉलेज आहे.

या मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कारभाराबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने नेमलेली चौकशी समिती या मेडिकल कॉलेजमध्ये आली होती.

इस्लामपूर येथील प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च संस्थेचा मेडिकल कॉलेजला तपासणी करायला आलेल्या मेडिकल पथकाला आज अटकाव करण्यात आला. तपासणी करू दिली नाही आणि कामकाज पार पाडण्यास आटकाव केल्याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.