रत्नागिरी : कोकणातल्या रस्त्यांचा मुद्दा पुन्हा ऐरवणीवर येणार आहे. कारण आता कोकणातली सर्व लोकप्रतिनीधी आता कोकणातल्या रस्त्यांच्यासाठी एकत्र येणार आहेत.
कोकणातल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र पँकेजची मागणी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे. कोकणातील सर्व लोकप्रतिनिधी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहेत. लवकरच कोकणातील सर्व लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्यांवरून रामदास कमद हे आक्रमक झाले होते. असं असताना आता कोकणातले लोकप्रतिनिधी स्वतंत्र पँकेजची मागणी करणार आहेत. केंद्रीय मंत्री अनंत गीतेंनी हि माहिती दिलीय.
राष्ट्रीय महामार्ग वगळून इतर रस्त्यांसाठी स्वतंत्र पँकेजची मागणी केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. मुंबई गोवा महामार्ग वगळून वाडी वाडीतल्या रस्ते किंवा इतर गावातील दुर्गम भागातल्या रस्त्यांसाठी हे पँकेज मागीतले जाणार आहेत.