जळगाव : भाजपची जळगाव जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक शहरातल्या एमआयडीसी परिसरातल्या बालाजी लॉन इथे पार पडली. प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. मात्र या बैठकीला माजी मंत्री एकनाथ खडसे अनुपस्थित होते.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी आणखी मजबूत करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या महत्त्वपूर्ण बैठकीला खडसे अनुपस्थित होते. या बैठकीला खास निरोप पाठविलेल्या पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रित केलं होतं. याबाबत जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी जाहीर केले. त्यानंतर माजी आमदार नाराज झालेत. त्यांनी बैठकीतून बाहेर पडणे पसंत केले.
या बैठकीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे उपस्थिती राहणार होते. परंतु या बैठकीला गिरीश महाजन उपस्थित राहिले. मात्र माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मात्र या महत्वपूर्ण बैठकीला दांडी मारलीय. खासदार सर्व आमदार, पक्ष पदाधिकारी, नगरपालिका नगरसेवक, नगराध्यक्ष, या बैठकीत हजर असून विशेष म्हणजे या बैठकीला खास निरोप पाठविलेल्या पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रित केले असल्याचं भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी जाहीर केल्यानंतर अमळनेरचे माजी भाजप आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी या बैठकीतून काढता पाय घेतलाय. पत्रकारांनाही या बैठकीत वृत्तांकनास मज्जाव केला गेल्यानं भाजपच्या अत्यंत गोपनीय या बैठकित अनेक खडसे समर्थकांची अनुपस्थित चर्चेचा विषय ठरलीय.