जळगावात व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

 शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी करण्याऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.

Updated: Jun 1, 2017, 12:47 PM IST
जळगावात व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी title=

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी करण्याऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच स्वामिनाथन आयोग लागू करावा, अशा विविध मागण्यांसाठी जळगावमध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला. 

शिवतीर्थ मैदानापासून घोषणाबाजी करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. दरम्यान खान्देशात धुळे, जळगाव आणि नंदुरबारातही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू  केले आहे. नाशिक जिल्ह्यात आंदोलनाचा जोर अधिक आहे.