रावेर हत्याकांडप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील चार भावंडांच्या हत्याकांडप्रकरणी  पोलिसांनी अखेर एका आरोपीला अटक केली आहे. 

Updated: Oct 22, 2020, 09:48 PM IST
रावेर हत्याकांडप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

जळगाव : जिल्ह्यातील रावेर येथील चार भावंडांच्या हत्याकांडप्रकरणी जळगाव जिल्हा पोलिसांनी अखेर एका आरोपीला अटक केली आहे. महेंद्र सीताराम बारेला या  १९ वर्षीय तरुणाला अटक आहे. वैद्यकीय पुराव्यांच्या आधारावर ही अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी दिली आहे. 

रावेर हत्याकांडाचा उलगडा लवकरच होईल असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे. मुलीवर  लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले असुन सामूहिक अत्याचार झाला आहे का, याबबत तपास सुरू आहे. ८० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तपास करत आहे. रावेर येथील शेतात चार भावंडाची रात्री हत्या करण्यात आली होती. कुऱ्हाडीने ही हत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुलीवर अत्याचार झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे यानी रावेर येथे पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. एकुण ७० लोकांची रावेर हत्याकांडात चौकशी केली आहे. ६० दिवसात चार्जशिट दाखल करणार असून, आरोपीनां शिक्षा होईल, असा विश्वास प्रविण मुंडे यांनी व्यक्त केला आहे.