जालना लोकसभा निकाल 2024: जालन्यातून रावसाहेब दानवे पिछाडीवर

जालना लोकसभा निकाल 2024:  जालन्यातून रावसाहेब दानवे पिछाडीवर  भाजपचे रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे कल्याणराव काळे यांच्यात जालन्यात थेट लढत होणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 4, 2024, 04:45 PM IST
जालना लोकसभा निकाल 2024:  जालन्यातून रावसाहेब दानवे पिछाडीवर title=
Jalna Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 Live Updates Vote Counting Lok Sabha Election raosaheb danve vs kalyanrao kale Losers List Election Results in Marathi

Jalna Lok Sabha Result 2024 in News in Marathi:  राज्यात जालना लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला होता. आता जालन्यातून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या जागेवर भाजपकडून रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांच्यात लढत होणार आहे. रावसाहेब दानवे हे पुन्हा सत्ता राखण्यास यशस्वी होणार का? हे काहीच वेळात स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळं जालन्यातील राजकारणाला फटका बसणार का? हे देखील स्पष्ट होणार आहे. 

जालन्यात सुरुवातीला हाती आलेल्या कलांमध्ये रावसाहेब दानवे आघाडी होते. तर, कल्याणराव काळे पिछाडीवर होते. मात्र, आता हाती आलेल्या कलांनुसार रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. दानवे सध्या 3354 मतांनी आघाडीवर आहे. 5 विधानसभा मतदार संघात दानवे यांनी आघाडी घेतली होती. मात्र काहीच वेळात हे चित्र पालटताना दिसत आहे. रावसाहेब दानवे हे पिछाडीवर असून 49858 मतांनी कल्याणराव काळे आघाडीवर आहेत. रावसाहेब दानवे सत्ता राखण्यास यशस्वी होणार की कल्याणराव काळे दानवेंना मात देणार याचे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. 

जालना मतदारसंघावर भाजपची मजबूत पकड आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे आत्तापर्यंत भाजपकडून पाचवेळा विजयी झाले होते. त्यांना सहाव्यांदा भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. गेली 25 वर्षे रावसाहेब दानवे हेच खासदार राहिले आहेत. त्यामुळं 2024 मध्येही रावसाहेब दानवे गड कायम राखणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

2019 मध्ये रावसाहेब दानवे यांना 6,94,945 मते मिळाली होती. तर, त्यांच्या विरोधात असलेल्या विलास औताडे यांना 3,64,348 मते मिळाली होती. 

सविस्तर माहिती थोड्याच वेळात