नितीश महाजन, झी मीडिया, जालना: हल्ली वैद्यकीय क्षेत्रातूनही धक्कादायक बातम्या (Shocking News) समोर येत असतात. सध्या अशाच एका बातमीनं सध्या सगळीकडेच खळबळ माजवली आहे. जालनामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जालनात एका वृद्ध महिलेला शस्त्रक्रियेसाठी (Eye Surgery) रूग्णालयात नेण्यात आले परंतु शस्त्रक्रिया होण्याआधीच महिलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. परंतु हा मृत्यू संशयास्पद असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. त्यामुळे शस्त्रक्रियाच्या वेळी नक्की मृत्यूच्या वेळी नक्की काय झालं याची चौकशी करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. परंतु डॉक्टरांच्या माहितीतून वेगळंच काहीतरी निषप्न्न झालं आहे. या प्रकारानं शहरात एकच खळबळ माजली आहे. परंतु नक्की काय प्रकार घडला जाणून घेऊया. (Jalna old Women before an eye operation a shocking revelation from doctor Maharashtra news Marathi)
डोळ्याच्या ऑपरेशनसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आलेल्या एका वृद्ध महिला रुग्णाचा ऑपरेशन करण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. 65 वर्षीय मुक्ताबाई साळुंके असं मृत महिला रुग्णाचं नाव आहे. त्या जालना जिल्ह्यातीलच अंतरवाला गावच्या रहिवासी आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या मुलींनी करत डॉक्टरांची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे .तर ऑपरेशनला घेऊन जाण्याआधी भुलेचे इंजेक्शन देण्यापूर्वीच या महिलेला हार्ट अटॅक आल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर या महिलेवर तातडीने आयसीयूमध्ये उपचार सुरु करण्यासाठी हलवण्यात आलं. मात्र नंतर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलं.
28 तारखेला 65 वर्षीय महिला डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी भरती झाली होती. तिच्यासोबत 25 आणखी पेशेंट्स होते. तिला तत्पुर्वीच हृदयविकाराचा झटका आला अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांचं बीपी वाढलेलं होते आणि त्यांना ऑपरेशनसाठी घेऊन गेले परंतु अचानक त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये काय असं घडलं आम्हाला काहीच कळलं नाही. ऑपरेशनला जाण्याअगोदर त्यांनी चांगलं खाल्लंही होतं, अशी माहिती मृत महिल्याच्या मुलीने दिली. त्या ऑपरेशनपुर्वी थिएटरमध्ये चालत गेल्या परंतु डॉक्टरांनी असं काय औषध दिली आणि तिचा मृत्यू झाला हे आम्हाला कळलंच नाही. त्यातून आम्हाला याबद्दल न्याय हवा आहे. याबद्दल आम्ही लेखी कारवाई केली आहे. अशा प्रकारे आमच्यावर अन्याय झाला असल्याचे मृत महिलेच्या कुटुंबियांनी सांगितले.