Jambhul of Badlapur : आपल्या अवीट चवीमुळे मुबई पर्यंत लोकप्रिय असलेल्या बदलापूर येथील जांभळांला अखेर भौगोलिक मानांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ठाणे जिल्ह्यात मिळालेल हे पहिले भौगोलिक मानांकन आहे. आता बदलापूरच्या जांभळांची जागतिक पातळीवर दखल घेतली जाणार आहे.
बदलापूरच्या जांभळांना अखेर भौगोलिक मानांकन मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. जांभूळ परिसंवर्धन ट्रस्टच्या आदित्य गोळे या तरुणाच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून भौगोलिक मानांकनासाठी प्रयत्न सुरू होते. विशेष म्हणजे भौगोलिक मानांकन प्राप्त होणारं बदलापूर जांभूळ हे देशातलं पहिलं जांभूळ ठरलं आहे.
बदलापूर परिसरातील सुमारे 20 गावातील सुमारे 1200 झाडे शोधून अंदाजित डाटा तयार करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून अस्सल, रसदार आणि गोड बदलापुरचा हलवी आणि गरवी जातीच्या जांभळाची आता जागतिक पातळीवर दखल घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे तसेच भौगोलिक मानांकन प्राप्त होणार बदलापूर जांभूळ हे देशातील पहिलं जांभूळ आहे.
जांभूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषतः पुरुषांसाठी जांभूळ हे फळ वरदान आहे. जांभूळ खाल्ल्याने वजन कमी होते, कारण त्यात फायबर असते ज्यामुळे वजन कमी होते. यासोबतच याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहते. जे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांच्यासाठी जांभूळाचे सेवन हा रामबाण उपाय आहे. त्यात आढळणारे पोटॅशियम रक्तदाबाची समस्या दूर ठेवते. ज्या पुरुषांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांच्यासाठी जांभूळ अत्यंत लाभदायी आहे. जांभळामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिचामीन सी असते. व्हिटॅमिन-सी त्वचा चांगली ठेवण्याचे काम करते.
केवळ अलिबाग तालुक्यात उत्पादीत होणारया पांढर्या कांद्याला आता भौगोलिक मानांकन मिळणार आहे . त्यामुळे अलिबागच्या पांढरया कांद्याचीओळख जागतिक पातळीवर अधोरेखित होणार आहे . कोकण कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ यावर संशोधन करणार आहेत . यासंबंधी रायगडचा कृषी विभाग , कोकण कृषी विद्यापीठ आणि ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी यांच्यात दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठात करार झाला . येत्या वर्षभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल असा अंदाज आहे . हा पांढरा कांदा अलिबाग तालुक्यात पिकवला जातो . रुचकर व औषधी गुणधर्म असल्यामुळे अलिबागचा पांढर्या कांद्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे काही व्यापारी इतर जिल्ह्यातील पांढरा कांदा आणून तो अलिबागचा पांढरा कांदा म्हणून विकतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. या कांद्याला वेगळं नाव मिळाल्यानंतर ग्राहकांची फसवणूक देखील थांबणार आहे .