पणजी : लग्नसराईचा माहोल फक्त बॉलिवूड आणि सर्वसामान्यांमध्येच नाही, तर राजकीय वर्तुळातही पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीनं रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं होतं.
मोजक्या उपस्थितांच्या साक्षीनं त्यांच्या मुलीनं जीवनातील नव्या टप्प्याची सुरुवात केली. ज्यानंतर आव्हाड यांच्या मुलीनं त्यांच्यासह आणि काही कुटुंबीयांसह थेट गोवा गाठलं.
इतरांसाठी सहलीचं ठिकाण म्हणून लोकप्रिय असणाऱ्या याच गोव्यामध्ये आव्हाड यांच्या मुलीनं ख्रिस्तधर्म पद्धतीनं पुन्हा विवाह केला.
पांढऱ्या शुभ्र लकाकीनं न्हाऊन निघालेला गाऊन, हेडगिअर असं एकंदर नताशा आव्हाड हिचं रुप गोव्यातील सोहळ्याक पाहाय़ला मिळालं.
तर, तिचा पती एलन हा काळ्या कोटात रुबाबदार दिसत होता.
पांढऱ्या रंगांच्या फुलांपासून साकारण्यात आलेल्या एका कमानीमध्ये या जोडीन 'I do', असं म्हणत एका नव्या इनिंगची सुरुवात केली.
मुळचा व्यावसायिक असणारा एलन पटेल याच्याबाबत राजकीय वर्तुळात बरंच कुतूहल दिसून आलं.
आव्हाडांचा जावई म्हणून त्याच्याबाबत अनेकांनी सोशल मीडियावरही उत्सुकता व्यक्त केली होती. एलनच्याच कुटुंबीयांच्या आग्रहाखातर हा गोव्यातील विवाहसोहळ्याचा थाट घालण्यात आल्याची माहिती समोर आली.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर या राजकारणातील मोठ्या चेहऱ्यांनी यावेळी आव्हाडांच्या लेकिला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती.