शहिदांच्या वारसाला एसटीत नोकरी, पत्नीला मोफत प्रवास

 शहिदांच्या वारसाला एसटीत नोकरी आणि पत्नीला मोफत आजीवन प्रवास पास देण्याची घोषणा, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. 

Updated: Jan 21, 2018, 09:26 AM IST
शहिदांच्या वारसाला एसटीत नोकरी, पत्नीला मोफत प्रवास  title=

यवतमाळ : एसटी महामंडळाच्या वतीने मुंबईत राष्ट्रीय कृतज्ञता दिन सोहळ्यात, एसटीच्या पहिल्या किफायतशीर शयनयान म्हणजेच स्लीपर कोच बसचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.

मोफत आजीवन प्रवास पास 

यावेळी परिवहन मंत्री शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहिद सन्मान योजनेची घोषणा करण्यात आली.

या योजनेंतर्गत शहिदांच्या वारसाला एसटीत नोकरी आणि पत्नीला मोफत आजीवन प्रवास पास देण्याची घोषणा, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. 

वीर बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प 

विशेष म्हणजे यवतमाळच्या आदिवासी महिलांची एसटी चालक म्हणून नेमणूक होणार आहे.

तर गडचिरोली जिल्ह्यात आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी युवकांची एसटी महामंडळाच्या विविध पदांवर नियुक्ती योजना वीर बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प नावाने राबवली जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.