नागपुरात पत्रकाराच्या आईचे आणि मुलीचे अहरण करुन हत्या

  शहरातील एका संकेतस्थळाचे पत्रकार रविकांत कांबळे यांची आई आणि चिमुकल्या मुलीचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 18, 2018, 03:53 PM IST
नागपुरात पत्रकाराच्या आईचे आणि मुलीचे अहरण करुन हत्या title=

नागपूर :  शहरातील एका संकेतस्थळाचे पत्रकार रविकांत कांबळे यांची आई आणि चिमुकल्या मुलीचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. 

कालपासून बेपत्ता

हत्या करण्यात आलेल्या उषा सेवकदास कांबळे (५४) आणि राशी रविकांत कांबळे (१८ महिने) या दोघी काल संध्याकाळपासून बेपत्ता होत्या. दिघोरीतील पवनपुत्रनगर येथे कांबळे कुटुंब राहते. या दोघीही शनिवारी संध्याकाळी ५.३० पासून बेपत्ता होत्या.

खरेदीसाठी दुकानात गेल्या होत्या

उषा या नातीला घेऊन काही खरेदी करण्याकरिता किराणा दुकानात गेल्या होत्या. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, त्यानंतर त्या घरी परतल्याच नाहीत. त्यामुळे शोधाशोध सुरु होता.

पोलिसांत तक्रारीनंतर शोध

दरम्यान, शोध न लागल्याने रात्री उशीरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोघींचा कसून शोध घेणे सुरु केले. मात्र, त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.