नागपूर : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना भाजपच्या साडेतीन नेत्यांचा भांडाफोड करण्याचा इशारा दिला आहे. यावर नागपूर येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना 'सामना अजून सुरु व्हायचा आहे. अभी तो टॉस हुवा है' असं सांगत सुचक इशारा दिलाय.
खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पातील राख नांदगाव डम्पिंगमध्ये टाकण्यास सुरवात केली. त्यामुळे या परिसरातील जमीन, शेती आणि लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याची दखल घेत याबाबत कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज आदित्य ठाकरे यांनी नांदगाव आणि परिसराची पाहणी केली. त्यांनी तेथील प्रदूषणाबाबत नाराजी व्यक्त केली. हरित लवादाने ताशेरे ओढत राख येथे टाकणे थांबवा असे निर्देश दिले आहेत. तर, आज आदित्य ठाकरे यांनीही हेच पाऊल उचलायला सांगितले.
यानंतर नागपुर विभागीय आयुक्त कार्यालय येथे पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांनी जागतिक स्तरावर कोळशावरून सोलरवर जाण्याचा प्लान सांगितला. त्याला आमचे समर्थन आहे. विकास होताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये हीच आमची भूमिका आहे.
मुंबईत आंदोलन दरम्यान वाहतूक कोंडी झाली. पण, मुंबई पोलिसांनी परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली. आता सर्व सुरळीत आहे. इथे राजकारणावर बोलणार नाही. अशा ठिकाणी आल्यावर नेहमी राजकारणामुळे किंवा मुंबईच्या विषयांमुळे इथल्या लोकांच्या मुद्द्यांवर दुर्लक्ष होतं, असेही आदित्य यांनी यावेळी स्पष्ट केलं.
उद्याची पत्रकार परिषद
संजय राऊत यांनी भाजपच्या साडे तीन नेत्यांची नवे जाहीर करण्याचा इशारा दिलाय. मात्र हे नेते कोण हे सांगण्यास नकार देत सामना होणार आहे, आधी टॉस होऊ द्या, मग बॅटिंग काय करायची ते पाहू असे उत्तर देत त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
गावकऱ्यांची मागणी ऐकण्यासाठी गावात दाखल
खापरखेडा प्रकल्पाला भेट देत असताना येथील गावकऱयांनी आदित्य ठाकरे यांनी गावात येऊन समस्या ऐकाव्या अशी इच्छा व्यक्त केली. ते मान्य करत आदित्य ठाकरे गावात कळत गेले. त्यांनी उपस्थित लोकांची नाराजी शांतपणे ऐकून घेतली त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. तर, मार्च महिन्यात येथे पुन्हा येऊन पाहणी करणार असे सांगत महाजनको व अधिकाऱ्यांवर टांगती तलवार ठेवली.