Kalyan Crime: 35 तुकडे नंतर 35 वार; दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्रात घडली थरकाप उडवणारी घटना

दिल्लीतील या श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्रात घडली थरकाप उडवणारी घटना घडली आहे. कल्याण(Kalyan) ग्राणीम हद्दीत ही भयानक घटना घडलेय.  प्रियकराने प्रेयसीला जंगलात नेऊन तिच्यावर 35 वार केले आहेत.

Updated: Jan 5, 2023, 04:20 PM IST
Kalyan Crime: 35 तुकडे नंतर 35 वार; दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्रात घडली थरकाप उडवणारी घटना title=

अतिश भोईर, झी मीडिया, टिटवाळा : दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांडाने (Shraddha Murder Case) संपूरण देश हादरला. श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताबने (Aaftab Poonawalla) तिची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे  35 तुकडे केले. आफताबने हे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले होते. रोज तो हे तुकडे एक एक करुन महरौली जंगलात(Mehrauli Forest) फेकत होता. दिल्लीतील या श्रद्धा हत्याकांडानंतर (Delhi Murder Case) महाराष्ट्रात घडली थरकाप उडवणारी घटना घडली आहे. कल्याण(Kalyan) ग्राणीम हद्दीत ही भयानक घटना घडलेय.  प्रियकराने प्रेयसीला जंगलात नेऊन तिच्यावर 35 वार करुन निर्घृण हत्या केली आहे. 
कल्याण ग्रामीण हद्दीत येणाऱ्या टिटवाळा येथील गोविली जंगलात ही घटना घडली घडलेय.  प्रेयसीवर 35  वार करुन तिची हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस तपासात हत्येमागे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे. जयराम चौरे असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याने मित्राच्या मदतीने प्रेयसी रुपांजली जाधव हीची निर्घृण हत्या केली आहे. 

या प्रकरणी अवघ्या २४ तासात कल्याण तालुका पोलिसांनी जयराम आणि यात त्याला मदत करणाऱ्या त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या दोघांचे विवाहबाह्य संबध होते. रुपांजली ही विवाहित होती.  ती पुण्यात राहत होती.आरोपी देखील पुण्यात राहत असल्याने दोघांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर नंतर प्रेम संबंधांमध्ये झाले. रूपांजली जयरामकडे सातत्याने लग्नाचा तगादा लावत होती. यामुळेच जयरामने तिची हत्या करण्याचा कट रचला. 

जयरामने रुपांजलीला टिटवाळा येथे भेटायला बोलावले. मला जंगलात सोने सापडले असून तू पण चल असे सांगून त्याने तिला गोविलीच्या जंगलात नेले. येथेच जयरामने मित्राच्या मदतीने रुपांजलीवर धारधारश्सत्राने सपासप वार करुन तिची निघृण  हत्या केली आणि जंगलातच तिचा मृतदेह फेकून फरार झाला. 
दरम्यान, स्थानिकांना रुपांजलीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. अवघ्या काहींच तासांत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.  आणि   अखेर पोलीसांनी दोघांना अटक केली आहे.

दिल्लीतील घटनेने देश हादरला 

आफताब आणि श्रद्धा दोघेही लिव्ह इनमध्ये राहत होते. वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकर या 28 वर्षीय तरुणीची तिचाच प्रियकर आफताब पुनावाला याने हत्या केली. आफताब याने श्रद्धाची हत्याच केली नाही तर क्रूरतेचा कळस गाठला. आफताबने तिच्या मृतदेहाचे तिच्या 35 तुकडे केले.