प्रणव पोळेकर, रत्नागिरी : तुम्ही जर टेरेसवर कपडे वाळत घालत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. टेरेसवर वाळत घातलेल्या कपड्यांमुळे एका 11 वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Girl's Death on Terrace at Ratnagiri) ११ वर्षांची कनिका चुनेकर. (Kanika Chunekar) आता या जगात जिवंत नाही. इमारतीच्या गच्चीवर ती खेळायला गेली होती. पण बराच वेळ झाला तरी ती परत आली नाही. म्हणून आई तिला शोधायला गच्चीवर गेली. तेव्हा कनिका खाली पडलेली दिसली. तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, पण तोवर फारच उशिर झाला होता.
खेळता खेळात कपडे वाळत घातलेल्या दोरीचा फास लागला आणि कनिकाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. कनिकाच्या पोस्ट मॉर्टेममध्ये पलमोनरी इडिमा असं मृत्यूचं कारण समोर आले. हे पलमोनरी इडिमा म्हणजे काय, हे समजून घ्यायला हवे.
रत्नागिरी । कपडे वाळत घातलेल्या दोरीचा गळफास#Ratnagiri pic.twitter.com/Fdw9dbcLLu
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 29, 2021
सोप्या शब्दात सांगायचं तर फुफ्फुसाला सूज येणं म्हणजे पलमोनरी इडिमा. फुफ्फुसावर आघात झाल्याने किंवा मार लागल्याने फुफ्फुसाला सूज येऊ शकते. शिवाय फुफ्फुसाला सूज येण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे लहान मुले जेव्हा खेळतात तेव्हा त्यांच्याकडे पालकांचं कायम लक्ष असणं गरजेचं आहे. याबाबतीत पालकांनी अधिक सतर्क होणं गरजेचं आहे.