नारायण राणे हाजीर हो! कणकवली पोलिसांनी बजावली नोटीस

नितेश राणे यांचे PA राकेश परब आणि वेंगुर्ला तालुका प्रमुख मनीष दळवी यांनाही नोटीस, दोघंही बेपत्ता

Updated: Dec 29, 2021, 03:08 PM IST
नारायण राणे हाजीर हो! कणकवली पोलिसांनी बजावली नोटीस title=

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांकडून चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. नितेश राणे हे नॉट रिचेबल असताना पोलिसांनी आता नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे कुठे आहेत ?  या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार नितेश राणे कुठे आहेत ते सांगायला मला मूर्ख समजला का? असा सवाल उपस्थित केला होता. त्या अनुषंगानेच कणकवली पोलिसांनी ही नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे समजत आहे.

नितेश राणे यांच्याबद्दल माहिती देण्याबाबत नोटिशीत उल्लेख करण्यात आलेला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणेंचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत. तसेच नितेश राणे नॉटरिचेबल आहेत. त्यांची माहिती मिळवण्यासाठी नारायण राणे यांना पोलीसांची नोटीस बजावण्या आली आहे. 

नोटीसनुसार आज दुपारी 3 वाजता पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. सीआरपीसी कलम 160 (1) अन्वये नोटीस पाठवण्यात आली आहे.

दरम्यान, नितेश राणे यांचे PA राकेश परब यांना देखील कणकवली पोलिसांची नोटीस बजावली आहे. वेंगुर्ला तालुका प्रमुख मनीष दळवी याना देखील कणकवली पोलिसांची नोटीस बजवालीची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, राकेश परब आणि मनीष दळवी दोघेही बेपत्ता आहेत.